Stone Pelting on NCP Candidate Suresh Shinde Residence Sparks
esakal
जत (सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे (NCP Candidate Suresh Shinde) यांच्या घरावर दोघा संशयितांनी दगडफेक केल्याने काल खळबळ उडाली. श्री. शिंदे यांच्या घराच्या खिडकीच्या काचा व चारचाकीची काच फुटली आहे. काल पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत जत पोलिस ठाण्यात दोघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही चित्रणात संशयितांच्या हालचाली नोंद झाल्या आहेत.