Dhananjay Mahadik railway demand
esakal
संख : जत रोड (वाळेखिंडी) ते कर्नाटकातील इंडी रोड (विजयपूर) या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या मागणीला चालना मिळाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांना पत्र देऊन या रेल्वेमार्गासाठी तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता सर्वेक्षण तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या मागणीला केंद्रस्तरावरही पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.