'जत यूथ' चा स्टॉल थेट 'लंडन' प्रदर्शनात 

 Jat Youth stalls in London exhibition
Jat Youth stalls in London exhibition

सांगली - जत तालुक्‍यातील ४२५ जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याचे लक्ष, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करणे, आदीसह सामाजिक उपक्रम यूथ फॉर जत या संस्थेने हाती घेतले आहेत. आता ही संस्था लंडनमधील वार्षिक व्यापारी प्रदर्शनात पोहोचली आहे. या प्रदर्शनाला १५०० लोकांनी भेट देत, यूथ फॉर जतच्या कार्याचे तोंडभरून कौतुकही केले. 
यूथ फॉर जतचे सह संस्थापक अजय पवार यांनी आपल्या संस्थेचे समाजपयोगी कार्यक्रम लंडन येथील वार्षिक व्यापारी प्रदर्शन कार्यक्रमामध्ये लोकांसमोर मांडले. यूथ फॉर जतने या प्रदर्शनामध्ये धमाल इव्हेंट्‌स या कंपनीसोबत आपला स्टॉल मांडला होता.

पूरग्रस्त वसगडे शाळेच्या दुरुस्तीसाठी पुढाकार

धमाल इव्हेंट्‌सने यापूर्वी यूथ फॉर जतला वसगडे येथील पूरबाधित शाळा दुरुस्तीसाठी मोठा निधी उभा करून दिला होता. यासह अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सांगलीसह कृष्णाकाठच्या परिसरात सप्टेंबर महिन्यामध्ये आलेल्या पुरात अनेक जिल्हा परिषद शाळांचे अतोनात नुकसान झाले. यातही युथ फॉर जत या संस्थेने पहिल्यांदाच जत तालुक्‍याची सीमा रेषा ओलांडून पुरबाधीत शाळेत मदत पोहोचविली. संस्थेने पलूस तालुक्‍यातील वसगडे जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर २ मध्ये शाळा नूतनीकरणाचे काम सप्टेंबर महिन्यापासून हाती घेतले होते.जत तालुक्‍यातील दुष्काळी भागातून आपले यशस्वी ध्येय गाठणारे हे तरूण देश विदेश पातळीवर चांगल्या पदावर कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सक्षमिकरणासाठी आपले योगदान देत आहेत. 

बाराव्या डिजिटल वर्गाचे उदघाटन

युथ फॉर जतने तालुक्‍यातील ४२५ जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्याचे लक्ष वेधले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिना निमित्त बाल विद्या मंदिर प्राथमिक शाळा, जत,  येथे १२ व्या डिजिटल वर्गाचे उदघाटन केले. 

तरुणांनी मांडली नवी संकल्पना

यूथ फॉर जत ही संस्था २०१६ पासून तालुक्‍यात कार्यरत आहे. जतमधील उच्च शिक्षित तरुण एकत्रित येत, हा सामाजिक उपक्रम हाती घेत समाजापुढे नवी संकल्पना मांडली आहेत. देश-विदेशात चांगल्या पदावर ही मंडळी काम करतात. सह संस्थापक श्री. अजय पवार, संस्थेचे अध्यक्ष दिनेश शिंदे, सचिव अमित बामणे, सदस्य सचिन जाधव, प्रवीण कोले, आदींसह तरुण तालुक्‍यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com