जत्राट : वेदगंगेची पाणी पातळी खालावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वेदगंगा नदीचे पाणी पातळी खालावली आहे.

जत्राट : वेदगंगेची पाणी पातळी खालावली

जत्राट: गेल्या चार दिवसापासून येथील वेदगंगा नदीचे पाणी पातळी खालावली आहे. काळम्मावाडी धरणातून वेदगंगा नदीला पाणी सोडले जाते. मात्र ते अद्याप न आल्याने पाणीपातळीत घट झाली आहे. सध्या उसासह विविध पिकांना पाणी देण्यात शेतकरी व्यक्त आहेत. मात्र पाणी पातळी घटल्याने अडचणी येत आहेत.

महिनाभरापासून वेदगंगा नदीचे पात्र दुथडी वाहत होते. त्यामुळे जनावरांच्या पाण्यासह पिकांची पाणी समस्या मिटली होती. नदीकाठावरील काही गावांनी नळपाणी योजना राबविली आहे. सध्या पाणी कमी झाल्याने या योजना धिम्या गतीने सुरु आहेत. महिनाभर सातत्याने पाणी उपसा झाल्यामुळे पाणी पातळी घटली आहे. सध्या नदीत काही प्रमाणात पाणी आहे. मात्र जनावरांना नदीत पाणी पाजण्यासाठी घेऊन गेल्यास गाळ वर येत असल्याने सर्वच पाणी गढूळ होत आहे. तसेच नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे पाणी गढूळ होत आहे. नागरिकांनी नदीपात्राची स्वच्छता ठेवल्यास सर्वांनाच स्वच्छ पाणी मिळणार आहे. सध्या ग्रामीण भागात जत्रा, यात्रांचा हंगाम सुरु झाला आहे. अंथरुण व कपडे धुण्यासाठी महिला नदीला जात आहेत. मात्र पाणी कमी झाल्यामुळे त्यांना कसरत करावी लागत आहे. तर काहीजण कूपनलिका व विहिरीवर अंथरूण व कपडे धुण्यासाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे. गैरसोय दूर करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

वेदगंगा नदीतील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. नदीला पाणी आल्यास पिकांना पाणी देणे सोयीस्कर होणार आहे.

-लक्ष्मण खोत,शेतकरी, जत्राट

Web Title: Jatrat Water Level Vedganga Lowered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top