जखमी अवस्थेतही त्यांची पराक्रमाची शर्थ

अमोल वाघमारे
मंगळवार, 19 जून 2018

सावळीविहीर (अहमदनगर) -''जम्मु-काश्मीरच्या सांबा बॉर्डरवरील सीमा सुरक्षा चौकीवर 23 मे रोजी पाकिस्तानी सैनिकांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले. त्याला भारतीय जवानांनी तोडीस तोड उत्तर दिले. या हल्यात मी गंभीर जखमी झालो. मात्र, त्याही अवस्थेत शत्रुशी दोन हात करीत पाकिस्तानी चौकी उदध्वस्त केली.....'' पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात जखमी झालेले निमगावचे सुपुत्र जवान राजेंद्र तात्याराम जगताप आपले अनुभव सांगत होते. 

ते ऐकताना गावातील प्रत्येक जण भारावुन गेला होता. मृत्युच्या दाढेतुन परतल्यानंतर निमगाव (ता.राहाता) येथे जगताप यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. वाहनातुन खाली उतरताच राजेंद्र यांनी आईची गळाभेट घेतली. यावेळी उपस्थीतांना अश्रु अनावर झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन राजेंद्र यांची गावातुन मिरवणुक काढण्यात आली. चौका-चौकात महिलांनी त्यांना औक्षण करुन ओवाळले. जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी हातात लेझिम. तिरंगा घेवुन ढोल-ताशांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुक काढली. 'भारत माता की जय'च्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते.

खंडोबा मंदीरात आयोजित सत्कार सोहळ्यात भाऊसाहेब कातोरे, भानुदास कातोरे, सोपानराव जगताप, बाळासाहेब गाडेकर, राम कातोरे, नितीन बारहाते, शिमोन जगताप आदींसग ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़.  गावातील प्रकाश खाबिया यांनी रोख पाच हजार रूपये देवुन जगताप यांचा गौरव केला़. 

या वेळी व्यासपीठावर माजी सैनिक दिनेश कुलकर्णी, नानासाहेब गाडेकर व विलास अहिरे यांची उपस्थीती होती़. उपसरपंच अजय जगताप, संजय नेहे, दत्तात्रय वाळुंज, किशोर कातोरे, सिंकदर शेख, मनोज वदक, धनंजय पाटील आदींनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला़. निमगाव, निमशेवडी, निघोज, सावळीविहीर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थीत होते.

ग्रामस्थांच्या आशीर्वादाने व आई-वडिलांच्या पुण्याईमुळे आज मी तुमच्यापुढे उभा आहे. पूर्ण बरा झाल्यानंतर मी पुन्हा नव्या स्फुर्तीने पुढील कामगिरी करील. गावच्या प्रेमाने मी भारावलो आहे. शिर्डीच्या पावनभुमीत जन्माला आलो. देशसेवेची संधी मिळाल्याने मी भाग्यवान आहे.
-जवान,राजेंद्र जगताप

Web Title: jawan rajendra jagtap his heroic dedication