इस्लामपूर : ‘‘उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे, ही आवश्यक आहे. ३० टक्क्यांहून अधिक उत्पादनात वाढ होऊन पाणी, खतात बचत होते, जमिनीची सुपिकता टिकते. प्रगतशील शेतकरी म्हणून उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करावा,’’ असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.