जयंत पाटलांचा फडणवीसांना जोरदार टोला ; गल्लीबोळात यात्रा काढून काय उपयोग ?

jayant patil criticized on devendra fadnavis in sangli topic of farmer protection in delhi
jayant patil criticized on devendra fadnavis in sangli topic of farmer protection in delhi
Updated on

इस्लामपूर (सांगली) : तिकडे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही आणि गल्लीबोळात यात्रा काढून आमचा कायदा कसा चांगला आहे हे सांगून काय उपयोग ? असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत राज्य सरकारवर टीका करत कायदा कसा चांगला आहे हे सांगितले होते, त्याला मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. ते वाळवा तालुक्यातील आष्टा येथील सभेत ते बोलत होते. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. 

यावेळी पाटील म्हणाले, 'भाजपचे लोक आज म्हणतायेत की राष्ट्रवादी काँग्रेसला मार्केट कमिट्या वाचवायच्या आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो आम्हाला मार्केट कमिट्या नाही तर आमच्या शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवायचे आहेत. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी हा लढा आहे. भाजप सरकारने आणलेला कायदा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी आज महाराष्ट्रात आणि उर्वरित देशात भाजपचे लोकं मोर्चा काढत आहे. माझे त्यांना आवाहन आहे की, इथे गल्लीत मोर्चा काढण्यापेक्षा दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधा.' आदरणीय शरद पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना एवढा मोठा हमीभाव दिला की दिल्लीतले शेतकरी आजही म्हणतात, 'पवारसाहब ने जो किया, वो आजतक किसीने नहीं किया.' 

पुढे ते म्हणाले, आजही एफआरपीचा कायदा अस्तित्वात आहे. कारण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नवी व्यवस्था तयार होत नाहीत तोपर्यंत जुनी व्यवस्था मोडून काढू नये या मताचे आम्ही आहोत. आज देशातील सर्व गोष्टींचे खाजगीकरण केले जात आहे. ते धनवानांच्या हाती जात आहे. ब्रिटिशांनी सर्व गोष्टी आपल्या हातात घेतल्या म्हणून तर आपण स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं. लोकांना संस्थांचा उपयोग व्हावा म्हणून तर स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीयीकरणाची भूमिका घेतली. पण आज सत्ताधारी या संस्था मोठ्या भांडवलदारांच्या हाती देत आहेत. केंद्र सरकारला ग्रामीण भागातील पतसंस्था नको आहेत. सहकारी बँकांना परवानगी दिली जात नाही पण खाजगी संस्था उभ्या राहत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com