नवेखेड : ‘‘पुरोगामी आणि स्वाभिमानी विचारांची ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच विजय मिळवेल,’’ असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. .‘‘पुरोगामी आणि स्वाभिमानी विचारांची ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच विजय मिळवेल,’’ असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला..Sangli Free Maize Seeds : चारा टंचाईवर मात करण्यासाठी मका बियाणे; वाळवा तालुक्यातील २४ पशुवैद्यकीय दवाखान्यांत बियाणे मोफत उपलब्ध.वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे बोरगाव व रेठरे हरणाक्ष गटातील विजयी उमेदवारांचा सत्कार, रुग्णवाहिकेचे लोकार्पण व वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, ‘महानंद’चे माजी अध्यक्ष विनायक पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, माणिक पाटील, विठ्ठल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती..जयंत पाटील म्हणाले, ‘‘बोरगावकरांच्या एकसंधपणा आणि जिद्दीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील विजय सुखकर झाला. काँग्रेससह युती करून निवडणूक लढविली आणि यश मिळवले..Sangli Unseasonal Rain : उमदी परिसरात अवकाळी पावसाचा दणका; द्राक्ष-आंबा पिकांचे मोठे नुकसान, बागा कोलमडल्या; शेडवरील बेदाण्याचे कंबरडे मोडले.दोन-तीन जागांवरील अनपेक्षित पराभवाचे शल्य आहे; मात्र भविष्यात प्राथमिक मराठी शाळा व ग्रामीण आरोग्य केंद्रांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ ते म्हणाले, ‘‘बोरगावची ‘आदर्श गाव’ म्हणून असलेली ओळख जपली पाहिजे. शेतीतील क्षारपडाचा प्रश्न सोडविण्यासाठीही ठोस पावले उचलली जातील..प्रचारसभेत दिलेल्या शब्दाप्रमाणे गावासाठी रुग्णवाहिका देण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या रुग्णवाहिकेमुळे गरजवंत रुग्णांना कऱ्हाड येथील कृषणा हॉस्पिटल, तसेच इतर ठिकाणी उपचारासाठी जाणे सुलभ होणार आहे.’’.माणिकराव पाटील म्हणाले, ‘‘बोरगाव हे फुले-शाहू-आंबेडकर विचार जपणारे गाव आहे. तरुणांनी एकसंघ राहून गावाची वेगळी ओळख टिकवावी.’’ ‘‘जिल्हा परिषद मतदारसंघातील विजय दैदिप्यमान असल्याचे सांगून रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल,’’ असा विश्वास प्रा. शामराव पाटील यांनी व्यक्त केला..यावेळी जिल्हा परिषद सदस्या कांता वाटेगावकर, प्रतिमा मोरे, पंचायत समिती सदस्या रुपाली स््पाटे, मनोज पाटील, पूजा मलगुंडी, स्वाती मदने, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, उदयसिंह शिंदे, शिवाजी वाटेगावकर, अनिकेत वाटेगावकर, शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे आदींची भाषणे झाली. नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. माणिकराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले..संकल्प आणि दोन घटनाभाषणादरम्यान जयंत पाटील यांनी दोन घटनांचा उल्लेख केला. दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अजित पवार यांच्यासोबत तीन बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होण्याचे ठरले होते आणि १२ फेब्रुवारीला तो पार पडणार होता; मात्र २८ जानेवारीला घडलेल्या घटनेमुळे तो पुढे ढकलावा लागला. .तसेच सांगलीचे माजी नेते मदन पाटील राष्ट्रवादीत येण्यास तयार होते. शस्त्रक्रियेनंतर मुंबईत भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही बरे व्हा, नंतर कार्यक्रम घेऊ,’ असे ठरले होते; मात्र आठ दिवसांत त्यांच्या निधनाने तो योग राहिला नाही. कोणत्या वेळी काय घडेल, सांगता येत नाही, असे भावनिक शब्दांत त्यांनी नमूद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.