
यावेळी पाटील यांनी फोटो चांगला आला पाहिजे असे उद्गार त्यांनी काढले.
सांगली : जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज मतदारसंघातील नवेखेड दौऱ्यावर आले असता एका चिमुकल्याने त्यांना 'मला तुमचा फोटो काढायचा आहे' अशी विनंती केली. रुद्र जंगम या मुलाच्या आग्रहा खातर त्यांनी त्याच्या सोबत फोटोसेशन केले. यावेळी पाटील यांनी फोटो चांगला आला पाहिजे असे उद्गार काढले.
आज मतदारसंघात नवेखेड येथे दौऱ्यावर असताना रुद्र जंगम हा मुलगा अचानक समोर आला आणि त्याने ‘मला तुमचा फोटो काढायचा आहे‘ अशी विनंती केली. त्याने माझा फोटो काढला आणि फोटो काढून झाल्यावर अगदी स्वतःहून कवितेप्रमाणे तोंडपाठ असलेले मंगलाष्टक देखील म्हणून दाखवले ! pic.twitter.com/1L7zdYSelt
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 20, 2020
त्यांनी आपल्या ट्विटमधुन रुद्र सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी या चिमुकल्यासोबत वेळ घालवला आणि त्याच्यातच ते काही काळ रमले. या मुलासाठीही हा क्षण अविस्मरणीय ठरणार आहे. यावेळी 'त्याने माझा फोटो काढला आणि फोटो काढून झाल्यावर अगदी स्वतःहून कवितेप्रमाणे तोंडपाठ असलेले मंगलाष्टक देखील म्हणून दाखवले!' असेही त्यांनी सांगितले आहे.
संपादन - स्नेहल कदम