
Jayant Patil Sangli : ‘‘भ्रष्टाचाराचे बेलगाम आरोप करून जेरीस आणायचे आणि पुन्हा पक्षात घेऊन ‘पवित्र’ करायचे ही प्रवेशाची पद्धत आहे,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज लगावला. काँग्रेसमधून निलंबित नेत्या जयश्री पाटील यांच्या मुंबईतील भाजप प्रवेशाच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर श्री पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदवली.