भिवर्गीत वाळूचे दोन टॅक्‍टरसह जेसीबी पकडला; तस्करांचे पलायन

JCB caught up with two Sand tractors in bhivargi; The smugglers fled
JCB caught up with two Sand tractors in bhivargi; The smugglers fled

संख  भिवर्गी (ता. जत, जि. सांगली ) येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून बोर नदीत वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्‍टर, एक जेसीबी पकडला. यावर्षातील ही सर्वांत मोठी कार्यवाही आहे. दरम्यान, करजगी हद्दीतील वाळू तस्करांना पथकाची माहिती मिळाल्याने त्यांनी पलायन केले. ही कार्यवाही शुक्रवारी रात्री 2:30 वाजता करण्यात आली. 

पूर्व भागात बोर नदीचे 56 कि.मी. अंतर आहे. तत्कालीन अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी धडक मोहीम राबवून तस्करीला मोठा चाप लावला होता. तस्करांवर कोट्यवधी रुपयांचा दंड, शेत जमिनीवर बोजा चढवण्यात आला आहे. मात्रत्यांची ऑक्‍टोबर महिन्यात त्यांची बदली झाली. त्यानंतर महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अप्पर तहसील कार्यालयाच्या दिवाळी सुटीचा फायदा घेऊन तस्करांनी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला होता. 

प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, संख अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसिलदार हणमंत मेत्रे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री 2:30 वाजता नदी पत्रातील भिवर्गी, खंडनाळ, करजगी हद्दीत येथे धाडी टाकल्या.

भिवर्गी येथे संख मध्यम प्रकल्पाजवळ एक वाळूने भरलेला, दुसरा वाळू भरत असतानाचा ट्रॅक्‍टर (केए 23, टीबी 4818) व एक जेसीबी (एमएच 13, एएच 0383) आढळून आला. यातील एक ट्रॅक्‍टर बिगर नंबरचा होता. कारवाईच्या भीतीने वाहनांचे चालक पळून गेले होते. महसूल विभागाच्या पथकाने वाहने, वाळू जप्त करून संख अप्पर तहसील कार्यालयाच्या अवारात आणले.

दरम्यान, करजगी हद्दीत वाळू तस्करांना पथक आल्याची माहिती मिळताच त्यांनी ट्रॅक्‍टरसह पथकाच्या हतावर तुरी देत अगोदरच पलायन केले आहे. 

वाळू तस्करीला चाप लावणार

ट्रॅक्‍टर, जेसीबीच्या मालकांना नोटीस दिली जाणार आहे. त्याच्यावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे. तसेच यापुढेही वाळू तस्करीविरोधात कडक मोहीम राबवून वाळू तस्करीला चाप लावणार आहे. 
- हणमंत मेत्रे, अप्पर तहसीलदार 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com