सातारा : जीप उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत कराडहून पुणे बाजूकडे निघालेली खासगी प्रवासी वाहतूक जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

वहागाव (ता. कऱ्हाड) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत कराडहून पुणे बाजूकडे निघालेली खासगी प्रवासी वाहतूक जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. खासगी प्रवासी वाहतूक गाडीचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला.

दरम्यान, या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीतून एकूण १४ प्रवासी कराडमधून पुणे बाजूकडे निघाले होते. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील सर्व जण कराड व तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती तळबीड पोलिसांनी दिली असून, अपघातातील सर्व जखमी व मृत व्यक्तींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. जखमींना उपचारासाठी कराडच्या सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeep accident two people kill and 10 injured in satara