टाकळी ढोकेश्वर ः राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तापितांसह तळागाळातील तरूणांना संधी देण्यास सुरूवात केली आहे. विशेषतः पुरोगामी चळवळीतील तरूणांना संधी दिली जात आहे. त्यात शिवप्रेमी, तसेच शिवव्याख्यात्यांवर पक्षाचे विशेष प्रेम आहे. शिवप्रेमी तसेच अभिनेता अमोल कोल्हे व शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत सभा गाजवल्या. त्यांच्या भाषणांमुळे सभांना गर्दीही होत होती. त्याचा विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदाही झाला. दस्तुरखुद्द शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही अमोल यांची तोंडभरून जाहीर कार्यक्रमात स्तुती केली होती. आता आणखी एका शिवव्याख्यात्यास महत्त्वाच्या पदावर कामाची संधी दिली जाणार आहे.
पारनेर-नगर मतदार संघाचे नाव आपल्या वकृत्व गुणातून महाराष्ट्रात पोहोचविणारे शिवव्याख्याते जितेश सरडे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाणार आहे.
माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील हे या महत्वाच्या पदाची धुरा संभाळत होते. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गेले काही दिवस हे पद रिक्त होते.
वरिष्ठ पातळीवर त्या पदासाठी विविध मान्यवरांची चाचपणी केल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेत त्यांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेणारे व सिंहगड महाविद्यालयातून औषधनिर्माण क्षेत्रात सरडे यांनी पदवी घेतली आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्या आक्रमकपणे सोडवण्यासाठी आपल्या वकृत्व गुणाच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर त्यांनी विविध प्रादेशीक वाहिन्यांवर विद्यार्थी चर्चासत्रात सहभाग नोंदवत जनजागृती केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांवर मार्ग काढत त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
सरडे हे आमदार नीलेश लंके यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सरडे यांना ग्रामीण आणि शहरी अशी दोन्ही प्रकारची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे श्रेष्ठींच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.