सावधान ! जोतिबाला जाताय...

Jotiba Tempel Children The Bitching Dog Careful Going Kolhapur Marthi News
Jotiba Tempel Children The Bitching Dog Careful Going Kolhapur Marthi News

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी येथे आज सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला. त्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह सहा जण जखमी झाले. त्यातील चौघांना उपचारांसाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. जखमींची नावे ः संग्राम बजरंग ठाकरे (वय ६), भूषण बाळू उपाध्ये (२५), केदार बाळू चिकलकर (), सुनिता लक्ष्मण उपाध्ये (५२, सर्व रा. जोतिबा) अशी आहेत.


हेही वाचा - सांगलीतील महापुर पोहचला जपानमध्ये  
            
पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर

आज सकाळची शाळा असल्याने शाळकरी मुले दारात खेळत होती. पिसाळलेल्या कुत्र्याने खेळणाऱ्या संग्राम ठाकरे याच्या पायाला चावा घेतला. हा प्रकार घरच्यांनी पाहिला. त्यांनी त्याची कुत्र्यापासून सुटका केली. यानंतर हे कुत्र्याने केदार चिकलकर या पाच वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. त्याच्या हाताला चावा घेतला. भूषण उपाध्ये यांच्या तोंडाला तर सुनिता उपाध्ये यांच्या पायाला चावा घेतला. अन्य दोघेही त्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com