जम्बो मतपत्रिका आली मुळावर, पण कोणाच्या? 

The jumbo ballot was supposed to be a problem, but to whom
The jumbo ballot was supposed to be a problem, but to whom
Updated on

नगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत 21 जागांसाठी एकूण 64 उमेदवार आखाड्यात आहेत. यामध्ये "सर्वसाधारण'मध्ये उमेदवारांची संख्या अधिक असल्याने, जम्बो मतपत्रिकेमुळे मतदान बाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा फटका आपल्याला बसतो का, याची धास्ती उमेदवारांसह नेत्यांना भेडसावत आहे. 

90 टक्के मतदान 
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 21 जागांसाठी आज शांततेत 90.45 टक्के मतदान झाले. "सर्वसाधारण'मधील 16 जागांसाठी 45, महिलांमधून दोन जागांसाठी सात, अनुसूचित जाती-जमातींमधून एका जागेसाठी पाच, इतर मागास प्रवर्गातून एका जागेसाठी तीन, विशेष मागास प्रवर्गामधून एका जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सर्वसाधारण मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने ही मतपत्रिका 23 बाय 18 इंच आकाराची म्हणजे सुमारे दोन बाय दीड फूट आकाराची होती. 

बाद होण्याची भीती 
या मतपत्रिकेवर फक्त सोळा मते देण्याचा अधिकार आहे. सोळापेक्षा एक जरी जास्त मत दिले गेले, तरी मतपत्रिका बाद समजण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान बाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची धास्ती उमेदवारांसह शिक्षक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवार नेत्यांकडून मतदारांना "सर्वसाधारण'मध्ये 16 जणांनाच मतदान करण्याबाबत सूचित केले जात होते. 

सोळाजणांना संधी 
सर्वसाधारण मतदारसंघात एकूण 16 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यामध्ये मतदाराने 16 जणांनाच मतदान करणे गरजेचे होते. 17 मतदान केले तर मतपत्रिका बाद होईल, तशी सूचनाही मतपत्रिकेवर दिलेली आहे. मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली असून, लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करणार आहे. 
- के. आर. रत्नाळे, तालुका उपनिबंधक, नगर 


"सर्वसाधारण'मुळे मतमोजणीस उशीर 
मतदान प्रक्रियेच्या वेळी मतदारांना सर्वसाधारण मतदारसंघात मतदान करताना सोळा उमेदवारांना मतदान करताना वेळ लागला. तसाच प्रकार मतमोजणीच्या वेळी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया लवकर होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकली आहेत; मात्र सर्वसाधारण मतदारसंघातील मतपत्रिका मोठी असल्याने मतमोजणी करताना अवधी लागणार आहे. त्यातून मतमोजणी प्रक्रियेला उशीर होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com