सर्वसामान्य प्रवाशाचा तीन रूपयांच्या वाढीच्या विरोधातील लढ्याला न्याय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

एखाद्या सामान्य प्रवाशाने अन्यायी दरवाढीविरोधात लढायचे ठरविले, की त्याचा काय निकाल लागतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून वसंत पांडुरंग पाटील-कंथेवाडीकर यांच्याकडे पाहता येईल. रंकाळ्यामार्गे जाणाऱ्या एसटीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ केल्याने त्या विरोधात पाटील यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली होती. ज्यांच्या विरोधात त्यांनी दावा दाखल केला त्यांनी नुकसानभरपाईपोटी सात हजार, मानसिक त्रासापोटी दहा हजार, अर्जाच्या खर्चापोटी तीन हजार रुपये रक्कम पाटील यांना देण्याचे आदेश मंचने दिले आहेत.

कोल्हापूर - एखाद्या सामान्य प्रवाशाने अन्यायी दरवाढीविरोधात लढायचे ठरविले, की त्याचा काय निकाल लागतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून वसंत पांडुरंग पाटील-कंथेवाडीकर यांच्याकडे पाहता येईल. रंकाळ्यामार्गे जाणाऱ्या एसटीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ केल्याने त्या विरोधात पाटील यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली होती. ज्यांच्या विरोधात त्यांनी दावा दाखल केला त्यांनी नुकसानभरपाईपोटी सात हजार, मानसिक त्रासापोटी दहा हजार, अर्जाच्या खर्चापोटी तीन हजार रुपये रक्कम पाटील यांना देण्याचे आदेश मंचने दिले आहेत.

राधानगरीकडे जाताना जाऊळाचा बालगणेश मंदिर, जुना वाशीनाका, साने गुरुजी वसाहत, नवीन वाशीनाकामार्गे, एसटी राधानगरीला जाते. या रस्त्यावर ड्रेनेजलाईनचे काम होणार असल्याने एसटी शालिनी पॅलेस, फुलेवाडी जकात नाका, फुलेवाडी रिंगरोड, नवीन वाशीनाकामार्गे राधानगरीला वाहतूक सुरू झाली. एसटीचे अंतर वाढल्याने कोल्हापूर ते राधानगरीपर्यंत तीन ते सात रुपये इतकी भाडेवाढ झाली. या मार्गावर दररोज सुमारे चार हजार प्रवासी एसटीने ये-जा करतात. त्यामुळे एसटीला दररोज दहा ते पंधरा हजार रुपयांचा फायदा होतो.

विभागीय नियंत्रकांना भाडेवाढ करण्याचा अधिकार नसताना त्यांनी ती वाढ केल्याचे तक्रारदार पाटील यांचे म्हणणे होते. २०१२ मध्ये पुन्हा मूळ मार्गाने एसटीची वाहतूक सुरू झाली, पण पर्यायी मार्गाच्या अंतरानुसार वाढीव दर व तिकीट दर कमी न करता वाढीव दरानुसार आकारणी सुरू झाली. फेब्रुवारी २०१२ मध्ये फुलेवाडी रिंगरोडवरील अयोध्या कॉलनी ते गडकरी कॉलनी येथे पाईपलाईन टाकण्याचे काम होणार असल्याने एसटी मार्ग बदलण्याची सूचना महापालिकेने केली. त्यानुसार मूळ मार्गावरून वाहतूक सुरू झाली.

ग्राहक तक्रार निवारण मंचने पाटील यांची तक्रार अंशतः मान्य करून त्यांना आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले. २३ ऑगस्टला मंचने हा निकाल दिला. त्याची प्रत पाटील यांना २५ सप्टेंबरला मिळाली. पाटील यांच्या वतीने ॲड. नामदेव कांबळे यांनी काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Justice for the common traveler against the rise of three rupees