सोलापुरात ज्वारीचा विमा हप्ता भरा 30 नोव्हेंबरपर्यंत 

संतोष सिरसट
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

उन्हाळी भुईमुगासाठी एक एप्रिलपर्यंत विमा हप्ता भरता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी बजाज अलियांन्झ जनरल इंशुरन्स कंपनी असेल. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे. 

सोलापूर : रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शासनाने आज जाहीर केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्वारीच्या विम्याचा हप्ता भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या मुदतीत विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्‍चित करण्यात आला आहे. या योजनेत गहू (बागायत व जिरायत), ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, करडई, सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील केवळ ज्वारी या पिकाचा विमा हप्ता 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहे. उर्वरित पिकांसाठी हप्ता भरण्याचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत आहे.

उन्हाळी भुईमुगासाठी एक एप्रिलपर्यंत विमा हप्ता भरता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी बजाज अलियांन्झ जनरल इंशुरन्स कंपनी असेल. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे. 

Web Title: jwar crop insurance Solapur