Jyotiba Nagar Pradakshina
sakal
जोतिबा डोंगर - सकाळच्या प्रहरी डोंगरावरून वाहणारे दाट धुके.. सोबतीला ऊन सावलीचा रंगलेला खेळ... हिरव्यागार निसर्गाच्या साथीत... गुलालाची भव्य उधळण करीत यमाईदेवी चोपडाई देवी महादेव काळभैरव व जोतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्री क्षेत्र जोतिबा डोंगर, ता. पन्हाळा येथे नगरप्रदक्षिणा सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. विना टाळ मृदंग ढोल-सनई शिंग शंख तसेच भजन कीर्तनाच्या गजरात प्रदक्षिणेत सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली.