
-अजित कुलकर्णी
सांगली : ‘नाट्यपंढरी’ अशी बिरुदावली असणाऱ्या सांगलीची कबड्डीनगरी अशी ओळख गेल्या अनेक दशकांपासून आहे. हुतूतू ते कबड्डीपर्यंत सांगलीने राज्यातच नव्हे, तर देशात दबदबा निर्माण केला. गेल्या काही वर्षांत शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात डझनभर मंडळे निर्माण झाली. त्यातून कबड्डीचा झंझावात शहरभर घुमत आहे. सांगलीवाडीत नुकताच त्याचा प्रत्यय आला. कुमार गटातील कबड्डी स्पर्धेत उपांत्य फेरीत सांगलीच्या संघाला भले हार पत्करावी लागली, मात्र राज्यभरातील खेळाडूंचा जोश व होश सांगलीकरांच्या कबड्डीप्रेमाचा ऐवज ठरला.