कडेगाव नगरपंचायत ‘ॲक्शन मोड’ मध्ये; कोरोनावर कडक उपाययोजना

दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णसंख्या ५४५ च्या घरात
कडेगाव नगरपंचायत ‘ॲक्शन मोड’ मध्ये; कोरोनावर कडक उपाययोजना
Updated on: 

कडेगाव : शहरात कोरोनाची वाढती (increased covid-19 patients) रुग्णसंख्या लक्षात घेता येथे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (vishwajeet kadam) व खासदार संजय पाटील (sanjay patil) यांनी नगरपंचायत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता नगरपंचायत प्रशासन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे.

गतवर्षी पहिल्या लाटेत शहरांत रुग्णांचे प्रमाण तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत अत्यल्प होते. तर दुसऱ्या लाटेत आजअखेर शहरातील रुग्णसंख्या ५४५ च्या घरात पोहोचली आहे. शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे रुग्ण वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेता. राज्यमंत्री डॉ. कदम व खासदार पाटील यांनी येथे तहसील कार्यालयात बैठका घेऊन कोरोनाचा महामारीचा आढावा घेतला. त्यामध्ये कडेगाव शहरात (kadegaon city) रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर उभय नेत्यांनी नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरले.

कडेगाव नगरपंचायत ‘ॲक्शन मोड’ मध्ये; कोरोनावर कडक उपाययोजना
सावधान! 'दत्तक असं' होत नाही; सांगली प्रशासनाकडून इशारा

नगरपंचायत प्रशासनाला तत्काळ प्रभावीपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. शहरांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरु केली आहे. तसेच येथे एमआयडीसीमध्ये नगरपंचायतीच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. येथे पॉझिटिव्ह आलेले व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची विलगीकरणाची चांगली व मोफत सोय झाली आहे.तसेच संचारबंदीचे उल्लंघन करुन विनाकारण बाहेर फिरणारे,

विनामास्क व नियम तोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तसेच लसीकरण व लॉकडाउन नियमाबाबत स्पिकरवरुन नागरिकांत जनजागृती केली जात आहे. तर ज्या स्मशानभूमीत कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. तेथे नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली आहे. तर त्यामध्ये नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे स्वतः सहभागी होत आहेत. तसेच कंटेन्मेंट झोनला वारंवार भेटी देवून पॉझिटिव्ह रुग्ण व गृह विलगीकरणातील नागरिक नियमांचे पालन करीत आहेत का? याबाबतही नगराध्यक्षा संगिता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, मुख्याधिकारी कपिल जगताप हे स्वतः लक्ष देत आहेत. अशा रीतीने नगरपंचायत प्रशासनाने सुरु केलेल्या उपाय योजनाबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कडेगाव नगरपंचायत ‘ॲक्शन मोड’ मध्ये; कोरोनावर कडक उपाययोजना
कोल्हापूर, सांगली महावितरणच्या 500 कर्मचार्‍यांचा सेवाभाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Sugarcane Price Protest
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Sujat Ambedkar allegations on voter registration process,
sai paranjpye
Marathi News Esakal
www.esakal.com