कडेगाव नगरपंचायत वार्तापत्र : "यहा पे सब शांती शांती है'

Kadegaon Nagar Panchayat Newsletter: "All peace is here"
Kadegaon Nagar Panchayat Newsletter: "All peace is here"

कडेगाव: नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या आठ ते नऊ महिन्यावर आली आहे. तरी सुद्धा येथे मोठ्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा व उदघाटनाचा धडाका पहायला मिळणे अपेक्षित असताना येथे मात्र 'यहा पे सब शांती शांती है' असेच चित्र पहायला मिळत आहे. 

कडेगाव ही डॉ. पतंगराव कदम यांची राजधानी. आपल्या पंधरा वर्षांच्या मंत्रिपदाचा कालखंडात त्यांनी येथे विविध विकास कामांचा डोंगर उभा केला. केवळ दहा हजार लोकवस्तीच्या कडेगाव सारख्या खेडेगावाला त्यांनी तालुक्‍याचा दर्जा मिळवून दिला. सर्व शासकीय कार्यालये इमारतीसह सुरु केली. यासह येथे शैक्षणिक, औद्योगिक व सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास केला.

तर तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व नगरपालिका व्हाव्यात अशी सूचनाही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आघाडी शासनाच्या कालावधीत मांडली होती. त्याची अंमलबजावणी मात्र नंतर सत्तेत आलेल्या युती शासनाने केली आणि त्यामुळे कडेगावला ग्रामपंचायत विसर्जित होवून नगरपंचायत अस्तित्वात आली. येथे नगरपंचायत झाल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलेल असे येथील नागरिकांना वाटले होते,परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. 

गेल्या चार वर्षात ठराविक ठिकाणी कॉंक्रीटीकरण, काही ठिकाणी रस्ते डांबरीकरण, गटारी व आणखी काही किरकोळ स्वरूपातील कामांचा अपवाद वगळता मोठ्या विकास कामांना बगल दिली गेली आहे. तर नगरविकास विभागाकडून नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. डॉ. विश्वजित कदम हे मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकतो. परंतु त्यासाठी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे.

परंतु गेल्या चार वर्षात येथे तसा कोणी पाठपुरावा केला नाही. त्यामुळे शहराचा चौफेर विकास झाला नाही. परिणामी गेल्या चार वर्षात एकही मोठे विकास काम झालेले नाही.तर नगरपंचायतीची हद्दवाढ,जल शुद्धीकरणासह नवीन नळ पाणी पुरवठा योजना आदी अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तरी आता मोठ्या विकास कामांचे नारळ फुटतील असे येथील नागरिकांना वाटले होते.परंतुनगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अवघ्या आठ ते नऊ महिन्यावर येऊन ठेपली आहे,तरीही येथे 'यहा पे सब शांती शांती है' अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com