कडेगाव नगरपंचायत वार्तापत्र  : निवडणूक तिरंगी होण्याची शक्‍यता 

Kadegaon Nagar Panchayat Newsletter : Election is likely to be triangular
Kadegaon Nagar Panchayat Newsletter : Election is likely to be triangular
Updated on

कडेगाव (​जि. सांगली) : नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक येत्या सात ते आठ महिन्यांवर आल्याने सत्ताधारी कॉंग्रेस, विरोधी भाजप यांनी जोर बैठका सुरू केल्या आहेत. असे असतानाच आता भाजप व कॉंग्रेसमधील नाराजांना एकत्र करून तिसरी आघाडीही निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी सूतोवाच केले आहे. त्यामुळे नगरपंचायतीची निवडणूक ही तिरंगी व रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 


कडेगाव शहर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच भाजपचीही येथे मोठी ताकद आहे. गतवेळच्या नगरपंचायत निवडणुकीत येथे कॉंग्रेस व भाजपमध्ये मुकाबला झाला होता. त्यामध्ये कॉंग्रेसने 17 पैकी 10 जागा जिंकत बाजी मारली होती; तर भाजपला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर अडीच वर्षे भाजपने विरोधी पक्षाचे काम चोखपणे पार पाडले. त्यामुळे नगरपंचायतीच्या चुकीच्या कामकाजावर भाजपने चांगलाच हल्लाबोल केला होता. 


त्यानंतर आता दुसऱ्या अडीच वर्षांच्या टर्ममध्ये भाजपने सत्ताधाऱ्यांशी मिळते जुळते धोरण अवलंबले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीत विरोधी पक्ष हा केवळ नावपुरताच राहिला असल्याचे भाजपचेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते जाहीरपणे बोलत आहेत. यामुळे भाजपमधील एक गट नाराज झाला आहे. 


या पार्श्वभूमीवर भाजप व कॉंग्रेसमधील नाराज आणि इतर पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांची मोट बांधून नगरपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकीत तिसरी आघाडी करून नगरपंचायत निवडणुकीत उतरणार असल्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड यांनी सूतोवाच केले आहे. 


दरम्यान, कॉंग्रेसनेही नगरपंचायतीतील आपली सत्ता कायम कशी रहावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे; तर भाजपनेही नगरपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसची मात्र येथे कसलीही तयारी दिसून येत नाही. 
एकंदरीत नगरपंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येईल तसे येथे राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. यावेळी पहिल्यांदाच तिसऱ्या आघाडीच्या रुपाने येथे तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे झाल्यास ही निवडणूक चांगलीच रंगतदार होईल, असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com