भंडारदऱ्यात लखलखला काजवा महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

लिंगदेव (अकोले) : पावसाने हजेरी लावली आणि अकोले तालुक्‍यातील भंडारदरा परिसरातील जंगलात रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात काजव्यांची लखलखती दुनिया अवतरली. एकमेकांच्या प्रेमात धुंद होऊ पाहणाऱ्या या प्रकाशमय कीटकांमुळे जणू आकाशातील तारकाच जमिनीवर अवतरल्याचा भास होतो. निसर्गात रंगलेला हा देखणा आणि अद्‌भुत "काजवा महोत्सव' पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊ लागला आहे. 

भंडारदरा धरण परिसरातील मुरशेत, मुतखेल, पांजरे, घाटघर व रतनवाडीच्या घनदाट जंगलात सादडा, बेहडा या वृक्षांवर काळोख्या अंधारात काजवा चमचमत आहे. लखलखीत प्रकाश निर्माण करणारे काजवे हजारोंच्या संख्येने एकाच वृक्षावर दिसत असल्याने, त्या झाडाला जणू "ख्रिसमस ट्री'चे सौंदर्य लाभते. असंख्य काजवे एकाच वेळी लयबद्धपणे चमकताना निसर्गाचा हा आविष्कार डोळ्यांचे पारणे फेडतो. हे मनमोहक दृश्‍य नजरेत कैद करण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची झुंबड उडू लागली आहे. 

Web Title: Kajwa Festival in Bhandari