esakal | दारिद्य्ररेषेखालील लोकांसाठी काळे यांचे पावणेसात लाख 

बोलून बातमी शोधा

ASHUTOSH KALE

आता या मतदारसंघातील एकूण सहा हजार 900 कार्डधारकांना व जवळपास 35 ते 40 हजार नागरिकांना फायदा होऊन, प्रत्येक कुटुंबाला 27 किलो गहू, नऊ किलो तांदूळ व एक किलो साखर, असा एकूण 1794 क्विंटल गहू, 621 क्विंटल तांदूळ व 69 क्विंटल साखर मोफत वितरित केली जाणार आहे.

दारिद्य्ररेषेखालील लोकांसाठी काळे यांचे पावणेसात लाख 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : हातावर पोट असलेल्या दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांवर "लॉक डाउन'च्या काळात उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सहा लाख 83 हजार रुपयांचा धनादेश रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके यांच्याकडे सुपूर्द केला. 
याबाबत बोरावके म्हणाले, ""धान्य घेण्यासाठी पैसे आणायचे कोठून, अशी विवंचना या कुटुंबांसमोर होती. मात्र, संकटकाळात नागरिकांना मदत करण्याची काळे परिवाराची समाजसेवेची परंपरा आमदार काळे यांनी अबाधित ठेवली. या जनतेला स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत धान्य मिळावे, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.

आता या मतदारसंघातील एकूण सहा हजार 900 कार्डधारकांना व जवळपास 35 ते 40 हजार नागरिकांना फायदा होऊन, प्रत्येक कुटुंबाला 27 किलो गहू, नऊ किलो तांदूळ व एक किलो साखर, असा एकूण 1794 क्विंटल गहू, 621 क्विंटल तांदूळ व 69 क्विंटल साखर मोफत वितरित केली जाणार आहे.

या वेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पुरवठा अधिकारी सचिन बिन्नोर, महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साईबाबा तपोभूमीचे सचिव धरमकुमार बागरेचा, विश्वस्त दत्तोबा जगताप, मनोहर कृष्णानी, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कैलास बोरावके, उपाध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव फकिरा टेके, रेशन दुकानदार उत्तमराव चरमळ, बाळासाहेब दवंगे, राजेंद्र होन आदी उपस्थित होते.