
विटा : चारचाकीने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील सुमेर महेबुब मुल्ला (वय २४, वाई, जि. सातारा) हा तरुण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत गुलाब अमिनसाब मुल्ला (वाई) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. हा अपघात रविवारी (ता. २०) दुपारी साडेचारच्या सुमारास खंबाळे (भा., ता. खानापूर) येथे वळण रस्त्यावर झाला. अपघातप्रकरणी चारचाकी चालक महेश सर्जेराव पाटील (वय ३३, शिवनगर, इस्लामपूर, ता. वाळवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.