

Tragedy in Karad: Farmer Struck by Lightning Dead at Bholewadi
Sakal
कऱ्हाड ः वादळी पावसाने आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तांबवे विभागात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असतानाच भोळेवाडी (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील शिवारात आज शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास विज अंगावर पडुन एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला. सतीश नाथा सुर्यवंशी (वय ५०) असे संबंधित शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती प्रशासनाकडुन देण्यात आली.