कऱ्हाडला चालक-वाहक कमी अन्‌ बस जास्त!

कऱ्हाडला चालक-वाहक कमी अन्‌ बस जास्त!

कऱ्हाड बस स्थानकात दररोज दोन हजारांवर बसच्या फेऱ्यांची ये- जा सुरू असते. तालुक्‍यातील बससेवेसाठी परिवहन महामंडळाने येथील आगाराला सध्या १०० बस उपलब्ध केल्या आहेत. वास्तविक आगाराला ९० बसची गरज आहे. मात्र, दहा जादा बस उपलब्ध आहेत. मात्र, आगाराकडे चालक- वाहकांची संख्या कमी आहे. काही वेळेला अपुऱ्या मनुष्यबळामुळे एसटीच्या काही फेऱ्या रद्द होण्याचेही प्रकार घडत आहेत, तरीही उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत तालुक्‍यातील २२० गावांतील प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज ९५० बसच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत.

एकाच गावाला एसटी नाही 
कऱ्हाड तालुक्‍यातील वानरवाडी गावचा अपवाद वगळता गावाला जोडणाऱ्या परिसरात व अनेक ठिकाणी थेट गावापर्यंत एसटीची सोय करण्यात आल्याचा दावा एसटीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. वानरवाडीलाही बससेवा सुरू केली होती. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ती बंद करण्यात आली आहे. 

जुन्या बसचा प्रश्न 
कऱ्हाड आगाराकडे उपलब्ध असलेल्या बसमधील बहुतांश बस या जुन्या आहेत. अनेक बस या दहा वर्षांपुढील आहेत. त्यामुळे त्या बस तालुका व जवळच्या अंतरासाठीच वापराव्या लागतात. लांब पल्ल्यासाठी धावणाऱ्या ठराविकच बस आहेत. जुन्या गाड्यांमुळे काही बस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत, तर काही बस दुरुस्तीसाठी थांबवाव्या लागत आहेत. त्यामुळे जुन्या गाड्यांचा प्रश्न सध्या उभा आहे. 

जमा- खर्चाचा बसेना ताळमेळ 
कऱ्हाड आगारातून दररोज ये- जा होणाऱ्या एसटीच्या ९५० फेऱ्या होतात. त्याद्वारे दररोज ३० हजार किलोमीटर बस धावतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. येथील एसटी आगाराला गेल्या सहा महिन्यांत एसटी चालवूनही तोटाच होत असल्याचे वास्तव आहे. 

खासगी वाहतूक जोरात 
कऱ्हाड तालुक्‍यातील वाड्या-वस्त्यांसह प्रत्येक गावातून वडापची वाहने कऱ्हाडला येतात. प्रत्येक वाहनांतून होणारी वाहतूक ही एसटीसाठी मारक असली, तरी प्रवाशांच्या गरजेनुसार ही वडापची वाहने मिळत असल्याने प्रवास सोयीचा होत आहे. त्यामुळे एसटीबरोबर खासगी प्रवाशी वाहतूकही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक घटकच बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com