
सांगली : एक गुंठा शेत जमीन क्षेत्राची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी कर्नाळच्या (ता. मिरज) तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (४९, रा. फ्लॅट नं. ५, हिरा अपार्टमेंट, एसटी कॉलनी, विश्रामबाग) व एजंट गणेश विश्वास कांबळे (३०, रा. पद्माळे, ता. मिरज) अशी दोघांची नावे आहेत.