मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) कागल विधानसभा मतदार संघातून (Kagal Assembly Constituency) सलग सहाव्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्याबद्दल बैलगाडा शर्यती आयोजित केल्या होत्या.
बेनाडी : येथील आनंद शर्यत (Bullock Cart Race) माळावर झालेल्या जनरल दुबैली गाड्यांचे मैदान महेश बोंद्रे (हरिपूर) यांच्या ‘बुलेट छब्या’ आणि ‘सांगोला राजा’ या नावाच्या बैलजोडीने मारले. यावेळी बोंद्रे यांना १ लाखाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संदीप पाटील (कोल्हापूर) यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना ७५ हजार रुपयांचे बक्षिसे देण्यात आले.