कर्नाटक विकेंड मुळे सीमानाक्यावर गर्दी कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karnataka checkpost
कर्नाटक विकेंड मुळे सीमानाक्यावर गर्दी कमी

karnataka Weekend lockdown; सीमानाक्यावरील गर्दी ओसरली

कोगनोळी : कर्नाटकात शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर(National Highway 4) असणाऱ्या कर्नाटक (Karnataka) सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली होती. सीमा तपासणी नाक्यावर चार चाकी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. पण वीकेंड जाहीर (karnataka weekend curfew) केल्याने कर्नाटकातील बाजारपेठ बंद असल्याने या ठिकाणी गर्दी अत्यंत कमी झाली आहे.

हेही वाचा: बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालये अतिथी प्राध्यापकांवरच अवलंबून

महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहन धारकांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. रिपोर्ट असणाऱ्या प्रवाशांनाच कर्नाटकात सोडण्यात येत आहे. अन्यथा महाराष्ट्रात परत पाठवून देण्यात येत आहे.गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सीमा तपासणी नाक्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी शासनाने आरटीपीसीआर रिपोर्ट सह कोरोना लसीकरण झालेल्या चा दाखला असणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अतिथी शिक्षकांची होणार भरती

कर्नाटक लगत असणाऱ्या महाराष्ट्रातील गडिंग्लज, आजरा, उत्तूर, चंदगड यासह अन्य खेडेगावात जाणाऱ्या प्रवाशांना आधार कार्ड पाहून सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहत यासह कोल्हापूर व अन्य ठिकाणी रोज ये-जा करणाऱ्या कामगारांना या ठिकाणी सोडण्यात येत आहे.या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर निपाणी मण्डल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, उपनिरीक्षक सिद्रामप्पा उनद, सहाय्यक उपनिरीक्षक एस आय कंबार, पोलीस शिवलिंग हुग्गार, होमगार्ड झाकीर नाईकवाडे शंकर कांबळे यांच्यासह अन्य पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top