सांगली जिल्हा  कारागृहात कारोनाचा शिरकाव 

अमोल गुरव 
Monday, 3 August 2020

सांगली ः सांगली येथील जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एकूण 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहातील 94 कैद्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 63 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यात तीन महिला आणि 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. 

सांगली ः सांगली येथील जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील एकूण 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहातील 94 कैद्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 62 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यात तीन महिला आणि 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे. 

सांगली जिल्ह्यात दिवसें दिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. पोलिसांमध्ये अधिच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आता जिल्हा कारागृहात शिरकाव झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सांगलीचे जिल्हा कारागृह क्षमतेपेक्षा अधिक भरलेले आहे. सध्या न्यायालयीन कामकाज बंद असल्याने जामीनाची प्रक्रिया ही थांबलेली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पुढे गेली आहे तर 1641 रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. 

आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. रविवारी एका दिवसात 268 रूग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karona infiltrates Sangli District Jail