कोल्हापूरः कासारी ग्रामस्थांचा सेनापती कापशी आरोग्य केंद्रावर मोर्चा 

प्रकाश कोकितकर
बुधवार, 19 डिसेंबर 2018

सेनापती कापशी - कासारी तालुका कागल येथील पल्लवी दिलीप जाधव या महिलेचा काल (ता.18) मासा बेलेवाडी उपकेंद्रात प्रसुतीनंतर लगेचच मृत्यू झाला. तरीही त्या कर्मचाऱ्यांनी बनाव करून रुग्ण गडहिंग्लज येथे नेला. त्यामुळे त्या कुटुंबावर आघात झाला. या प्रश्नी आज कासारी व कापशी परिसरातील नागरिकांनी येथील आरोग्य केंद्रावर मोर्चा काढला.

यावेळी येथील कर्मचाऱ्यावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. संबंधित आरोग्य सेविका के. बी. मुल्ला यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय येथून जाणार नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी येथे आले पाहिजेत, कर्मचाऱ्यांचा धिक्कार असो, अशा प्रकारच्या घोषणा देऊन ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राच्या समोरच बैठक मांडली.

यावेळी आरोग्य समितीचे सर्व सदस्य आले पाहिजेत असाही आग्रह झाला. शक्य नसताना प्रसूती का केली त्यासंबंधीत के. बी. मुल्ला यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देत लोकांनी राग व्यक्त केला. जिल्हा आरोग्य अधिकारी येऊन त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली.

येथील आरोग्य अधिकारी डॉ. विशाल शिंदे म्हणाले," येथे दोन आरोग्य अधिकाऱ्यांची गरज असताना एकच अधिकारी आहेत त्यामुळे आरोग्य केंद्र सोडून उपकेंद्रांमध्ये जाता येत नाही आरोग्य उपकेंद्र मध्ये प्रसूती केली जाते तेथील आरोग्यसेविका प्रशिक्षित आहेत मात्र कठीण परिस्थितीत त्यांनी रुग्णाला येथील आरोग्य केंद्रात आणणे आवश्यक आहे. अथवा पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात नेले पाहिजे. मात्र कालच्या रुग्णाबाबतीत तसे झाले नाही. अॅम्बुलन्सची मागणी झाल्याबरोबर ती उपलब्ध करून दिली होती. मात्र उपचाराला वेळ झाला होता."

मोर्चामध्ये माजी सरपंच तानाजी पाटील दिलीप तिप्पे, सागर मोहिते, तानाजी गणपती पाटील, अशोक कुरणे, राजाराम पाटील, भिकाजी पाटील, संजय माळी, किरण माळी, उमेश देसाई, आदिनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

Web Title: Kasari villagers agitation in Senapati Kapshi Health center