esakal | कवठेमहांकाळकरानो सावधान करोना वाढतोय; तालुक्‍यात 20 रूग्णांचा आकडापार
sakal

बोलून बातमी शोधा

डाउनलोड करा (1).jpg

शहरासह गावोगावी मुंबई-पुणे तसेच परराज्यातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने गावस्तरावर निर्माण झालेल्या ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीवर ताण पडत आहे.

कवठेमहांकाळकरानो सावधान करोना वाढतोय; तालुक्‍यात 20 रूग्णांचा आकडापार

sakal_logo
By
गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (सांगली): कवठेमहांकाळ तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोना रग्णांचे प्रमाण वाढत आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. तरीही कवठेमहांकाळ शहरासह तालुक्‍यातील गावागावात सूचनांचे पालन केले जात नाही. कवठेमहांकाळकरांनो आतातरी जागृत व्हा अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.

 
कवठेमहांकाळ तालुक्‍यात सध्या कोरोनाचे रुग्णसंख्या वीस आहे. त्यातील दहाहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. मात्र शहरासह गावोगावी मुंबई-पुणे तसेच परराज्यातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने गावस्तरावर निर्माण झालेल्या ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीवर ताण पडत आहे. समितीकडून गावांमध्ये आलेल्या नागरिकांची नोंद असल्याने काहीवेळा होते.

तर काही नागरिक गावात येतात मात्र त्याची माहिती समितीला देत नसल्याचे चित्र आहे. तालुकास्तरावरुन तहसीलदार बी.जे.गोरे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दत्तात्रय पाटील, मुख्याधिकारी संतोष मोरे यांच्या समितीने गावोगावी भेटी देत कोरोणाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.मात्र त्याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

गावोगावी अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यांनीही गावांमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या वर लक्ष ठेवले आहे मात्र नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे जनजागृती केली जात आहे. दरम्यान कवठेमहांकाळकरांना आतातरी जागरूक होऊन शहरासह गावोगावी येणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्यासाठी पुढाकार घेऊ व कोरोणाला हद्दपार करूया अशी शपथ घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

मास्क न वापरताच बाहेर... 
तालुक्‍यातील काही गावात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. शहरातही एक रुग्ण सापडला होता. दरम्यान तालुकासतरीय समितीने तालुक्‍यातील नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे,सॅनिटायझर वापर करणे,हात वारंवार साबणाने धुणे अशा सूचना दिल्या होत्या. मात्र सूचनांकडे तालुक्‍यातील नागरिकांकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. काही लोक विना मास्क शहरातून फिरताना दिसत आहेत. 

  • एकूण रुग्ण - 20 
  • उपचारा नंतर बरे झालेले रुग्ण - 12 
  • उपचाराखालील रुग्ण - 08  

संपादन - शैलेश पेटकर 

loading image
go to top