कवठेमहांकाळला 'फड सांभाळ गं तुऱ्याला आला..'.

संताजी भोसले 
Monday, 4 January 2021

कवठेमहांकाळ तालुक्‍यात महांकाली सहकारी साखर कारखाना बंद असल्याने तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात फड सांभाळ गं तुऱ्याला आला. तुझ्या ऊसाला लागल ग कोल्हा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याला कोण वाचवणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

रांजणी : कवठेमहांकाळ तालुक्‍यात महांकाली सहकारी साखर कारखाना बंद असल्याने तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात फड सांभाळ गं तुऱ्याला आला. तुझ्या ऊसाला लागल ग कोल्हा ! ऊस उत्पादक शेतकऱ्याला कोण वाचवणार ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्‍यातील विविध गावातील ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हैसाळ उपसा जल सिंचन योजनेचे पाणी आल्यामुळे व यंदा कवठेमहांकाळ तालुक्‍यात जोरदार पाऊस झाल्यामुळे ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. रांजणी, लोणारवाडी, अग्रण धुळगाव, कोकळे, अलकुड (एस) सह गावांत ऊस क्षेत्र वाढले आहे. 

आर्थिक अडचणीमुळे यंदा श्री महांकाली सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही. तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. तालुक्‍यातील विविध भागात वसंतदादा शेतकरी(दत्त इंडिया), केंपवाड येथील कारखाना, आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारखाना, तासगांव येथील कारखाना, जत येथील कारखान्याच्या ऊसतोड मजूरांच्या टोळ्या विविध गावांत ऊसतोड करीत आहेत. 
लागणीचा ऊस तोडला जात आहे. खोडवा तोडत नाही. रस्ता नसेल तर जादा पैशांची मागणी केली जाते. तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात ऊस आहे. मात्र वेळेत ऊस तोडला जात नाही. पिकविलेला ऊस तोडला जाणार की नाही ? अशी भिती निर्माण झाली आहे. 

तोडणीसाठी पैशाची मागणी :
"महांकाली'च्या कार्यक्षेत्रात विविध टोळ्या दाखल झाल्या आहेत. ऊसतोडणी करीत आहेत. परंतु मजूरांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. एकरी 5 हजार, 7 हजार ते 10 हजारांची मागणी केली जाते. प्रती टनास वाड्यासाठी पैसे घेतले जातात. वाहन चालकास दर खेपेस पाचशे रूपये व जेवण द्यावे लागते ते वेगळेच. 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavathemahankala 'Phad sambhal gam turya aala ..'.