सोशल डिस्टन्स ठेवा, रेशन धान्य वितरण करा

सतीश तोडकर 
Friday, 7 August 2020

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता रेशन दुकानातून धान्य वितरण करीत असताना दुकानदारांनी शासनाच्या आदेशाचे पालन करीत सोशल डिस्टन्स ठेवावा तसेच सर्व रेशन धान्य दुकानदारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी केले. 

कडेगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता रेशन दुकानातून धान्य वितरण करीत असताना दुकानदारांनी शासनाच्या आदेशाचे पालन करीत सोशल डिस्टन्स ठेवावा तसेच सर्व रेशन धान्य दुकानदारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी केले. 

येथे तहसील कार्यालयात प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्‍यातील रेशन धान्य दुकानदारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार पाटील बोलत होत्या.यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र यादव ,तालुका पुरवठा अधिकारी वसंत मिरजकर उपस्थित होते. 

त्या म्हणाल्या, तालुक्‍यातील रेशन धान्य दुकानदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या रेशन धान्याचे वितरण सामाजिक बांधिलकी जपत करीत आहेत.परंतु हे काम करीत असताना जिल्ह्यातील काही दुकानदारांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तेंव्हा धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स ठेवावा व दुकानदारांनी स्वतःची व आपल्या परिसरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. 

दरम्यान यावेळी तालुक्‍यातील 82 रेशन दुकानदारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.त्यामुळे दुकानदारांतून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष वसंत जाधव , सूर्यकांत देसाई, अशोक देशमुख ,कमाल आत्तार, वैशाली गायकवाड, रूपा माने, जयश्री मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने रेशन दुकानदार उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep social distance, distribute ration grains