
सांगली- आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, मग ते ऑनलाईन आहे किंवा नाही हे माहीत नाही. पण सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य मिळणार या आशेवर अनेक कुटुंब विसंबून आहेत. त्यांनी दुकानदारांकडे चौकशी केली असता तुमचे कार्ड ऑनलाईन नसल्याची उत्तरे मिळू लागलेली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला फ्रिसेलच्या धान्य सांगली जिल्ह्यात येण्यासाठी मे महिना उजाडणार आहे. तरीही अनेकांकडून धान्यासाठी आतापासूनच चौकशी अन् हेलपाटे सुरू झालेले आहेत. कोरोना येणार हे माहिती होत का, असे प्रश्न आता कार्डधारक उपस्थित करीत आहेत.
अनेकांनी अडगळीत पडलेली रेशनकार्ड हुडकून काढली असून दहा-बारा वर्षांनी त्यांचा शोध घेतला जातो आहे. आता ते म्हणताहेत, कार्ड ऑनलाईन आहे की नाही, माहिती नाही मात्र सरकारने आम्हाला केलेल्या धान्यांच्या घोषणा केलीय. अन् आम्हाला धान्य मिळायला हवे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक कार्डधारकांची अशीच अवस्था झालेली आहे. मात्र त्यांना धान्य मिळेल किंवा नाही हे सांगणे आता कठीण झालेले आहे. पुरवठा विभागाकडून प्रत्येक वर्षी कार्डधारकांना आधार क्रमांकासी लिंक करण्याचे आवाहन केले जाते. मात्र त्याकडे लोकही दुर्लक्ष करतात, हे खरे आहे. मात्र सध्या त्यांना धान्याची गरज आहे.
शिधापत्रिकांचा वापर रहिवासी दाखला म्हणूनही होत नसल्यामुळे अनेकांनी कार्ड कुठे तरी गुंडाळून ठेवलेली आहेत. आलीकडे आधार कार्ड आल्यापासून तर रेशनकार्डला किंमतच उरलेली नाही. सध्या धान्य मिळणार याची घोषणा केल्यानंतर मात्र याची अनेकांना आठवण झाली. घरात धान्य असेल तरीही भविष्यात परिस्थितीची अंदाजच येत नसल्याने सर्वांनाच घरी धान्य असावे, असे वाटू लागले आहे. याचमुळे सर्व केशरी कार्ड असलेल्यांकडून दुकानदार तसेच पुरवठा विभागात चौकशीसाठी रांगा लागलेल्या आहेत.
"कार्ड ऑनलाईन, शासकीय नियम हे सर्व बरोबरही आहे. मात्र आम्हीच नव्हे तर जगाने कधी कोरोनाचा विचार केला होता का?, त्यासाठी सर्व जग लॉकडाऊन झाले आहे. असे कोनाच्या तरी स्वप्नात हे होते का?, तशीच गोष्ट आहे. रेशनकार्डवर धान्य घ्यावयाची वेळ येईल, याची कल्पनाही आम्हाला करवत नव्हती. मात्र ती सध्या वेळ आलेली आहे. याचा सरकार आणि प्रशासनाने विचार करावा. कार्ड असलेल्यांना धान्य देऊन शासकीय सोपस्कर पुन्हा पूर्ण करून द्यावेत, अशी अपेक्षा आहे.'
पी. एम. कुलकर्णी, विजयनगर, सांगली.
...................
"केशरी कार्डधारकांच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्यात काही वेळी लोकांच्या चुका असतील. मात्र त्या उगळत बसण्यापेक्षा सरकार, प्रशासनाच्याच मार्गदर्शनाखाली धान्य देण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यासाठी एखादी गोष्ट मनावर घेण्याची गरज आहे.'
सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच, सांगली.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.