रेल्वेस्थानकात फलाटावरून ट्रॅक्‍टर घसरला अन्‌.... 

At Kirloskarwadi the railway station, the tractor fell off the platform and train came
At Kirloskarwadi the railway station, the tractor fell off the platform and train came
Updated on

किर्लोस्करवाडी (जि. सांगली) ः त्या ट्रॅक्‍टरचालकाचं नशीबच बलवत्तरच म्हणायचं.... येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट कामासाठी कार्यरत असलेला हा ट्रॅक्‍टर फलाटावरून घसरला.  नेमकी त्याचवेळी मिरजेहून पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी स्थानकात आली. ती गाडी थांबणार नसल्याने पलीकडच्या दुसऱ्या रुळावरून निघून गेली. ती जर थांबणारी गाडी असती, तर तिने ट्रॅक्‍टरला उडवले असते. एक मोठा अपघात टळला. आज दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने सर्वांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. 


याबाबतची अधिक माहिती अशी ः गेले चार पाच महिने किर्लोस्करवाडी येथील स्थानकाच्या फलाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी भराव टाकणारा ट्रॅक्‍टर येथे काम करीत होता. या वेळी टॅक्‍टरचे चाक फलाटावरून घसरले. काही केल्या चाक निघत नव्हते. तितक्‍याच मिरजेच्या दिशेने रेल्वे आली. ट्रॉलीतील कामगार बिथरले. चालकाला मात्र ट्रॅक्‍टर सोडून जाता येईना. 


आता अपघात अटळ अशीच स्थिती असताना, ही रेल्वेगाडी स्थानकावर न थांबणारी असल्याने फलाटाशेजारच्या रुळावरून न जाता पलीकडच्या रूळावरून गेली. मोठा आवाज करीत ट्रॅक्‍टर शेजारूनच गेलेली ही गाडी म्हणजे जणू यमाचा अवतारच होती. चालकाने त्या ट्रॅक्‍टरमध्ये बसून जवळून गेलेला मृत्यू पाहिला....

रेल्वेगाडी पुढे निघून जाताच सारे ट्रॅक्‍टरच्या दिशने धावले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर बचावल्याची भावना होती. ती रेल्वेगाडी धाड धाड करीत पुढे निघून गेली, खरी मात्र अनेकांच्या हृदयातील धडधड मात्र बराच वेळ कायम होती... 

कर्मचारी आणि ठेकेदाराला सूचना
आजचा प्रकार गंभीर आहे. ट्रॅक्‍टर चालकाला रुळाजवळ तत्काळ वळता न आल्याने तो अडकला. कर्मचारी आणि ठेकेदाराला काळजीपूर्वक कामाच्या सूचना देण्यात येतील. 
- राजेश वानखडे, स्टेशन मास्तर, किर्लोस्कर रेल्वेस्थानक 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com