डॉ. अरुण पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला यांनाही अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - कुमारीमाता, विधवा महिलांची अपत्य बेकायदा विकल्याप्रकरणी डॉ. अरुण पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांनाही शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. उज्ज्वला पाटील यांना अटक केल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.

येथील डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखान्यावर दिल्लीतील महिला बालकल्याण समितीच्या पथकाने धाड टाकली होती. दवाखान्यात कुमारीमाता, विधवा महिलांचे अवैधरीत्या बाळंतपण केले जात असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी डॉ. पाटील यांना अटक केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

याप्रकरणी डॉ. पाटील यांनी मुंबईतील डॉक्‍टर अमोल सवाई, चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगावचे अभियंता अनिल चहांदे यांना बाळ विकल्याचे तपासात उघड झाल्याने दोन्ही दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चहांदे दाम्पत्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आज याप्रकरणी डॉ. पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला यांना अटक केली. 

दरम्यान, दवाखान्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. एस. एस. कडोलीकर यांचा पोलिसांनी जबाब घेतला असून, डॉ. पाटील यांचा निरोप आल्यावर दवाखान्यात जात असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. या प्रकरणातील सहभागाबाबत उज्ज्वला पाटील यांचा कसून तपास सुरू आहे.

संबंधीत बातम्या

Web Title: Kolahpur News Kolhapur News Raid On Dr Arun Patil Hospital Followup