राज्याचा मुख्यमंत्री दोघांनी मिळून ठरवूया - चंद्रकांत पाटील

संभाजी थोरात
बुधवार, 20 जून 2018

कोल्हापूर -  राज्याचा मुख्यमंत्री शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष मिळून ठरवूया आणि आपल्या विभाजनाचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला होऊ नये असे पाहूया, असे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये व्यक्त केले..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतल्या मेळाव्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे म्हटले होते यावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असून नदीकाठच्या गावांमध्ये अभ्यास करून सांडपाणी प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा होतोय, त्यामुळ पंचगंगा नदी प्रदूषण होत असलेल्या ठिकाणीच सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देण्यासाठी प्रयत्न करणार असून ज्या गावांना दूषित पाणीपुरवठा होतोय त्या गावांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करणार असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली. 

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment