esakal | लोकसहभागातून कडवी नदीपात्राची स्वच्छता
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसहभागातून कडवी नदीपात्राची स्वच्छता

लोकसहभागातून कडवी नदीपात्राची स्वच्छता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आंबा, जि. कोल्हापूर - कडवी नदी स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात चांदोली ग्रामस्थांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून अर्ध्या किलोमीटरची नदीची स्वच्छता केली. 

सरपंच नामदेव पाटील व माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्या पुढाकाराने चांदोलीतून नदी स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. ग्रामस्थांनी अर्ध्या किलोमीटर अंतरादरम्यान नदीपात्रात आलेल्या झाडाच्या फांद्या, वाळलेली व कुजलेली झाडे, प्लॅस्टिक बाटल्या बाहेर काढून नदीपात्र मोकळे केले. चौदा ठिकाणी कुरव काढण्यात आले. 

या वेळी शिक्षक महादेव कुंभार (आळतूर) यांनी नदीचे महत्त्व व प्रदूषणाबाबत मार्गदर्शन केले. राजेंद्र लाड यांनी प्रास्ताविक केले. आंब्याच्या सरपंच साक्षी भिंगार्डे, शिराजभाई शेख, अमोल महाजन, दिलीप कुंभार, पोलिस पाटील अमिना पटेल (घोळसवडे), वैशाली पाटील (चांदोली), बिसमिल्ला वाघारे (जावली), शमीम वारुणकर उपस्थित होते. आनंदा कुंभार यांनी आभार मानले. 

नदीपात्राची रुंदी वाढविणार 
अरुंद नदीपात्र तीस फूट रुंद करण्याचे नियोजन आहे. लोकसहभाग व श्रमदानातून आतापर्यंत अर्ध्या किलोमीटर नदीची स्वच्छता झाली आहे. मशिन व श्रमदानातून उर्वरित काम लवकरच पूर्ण करणार आहे. 
- नामदेव पाटील, सरपंच (चांदोली ग्रामपंचायत) 

loading image