पन्हाळा तालुक्यात कासारी नदीत मगरीचे दर्शन 

धनाजी पाटील
बुधवार, 23 मे 2018

पुनाळ - पुशिरे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा ) येथील कासारी नदीत मगरीचे दर्शन नित्याचे झाले आहे .त्यामुळे कपडे, जनावरे धुण्यासाठी जाणारे नागरिक तसेच पोहायला जाणाऱ्या तरुणांच्यात भितीचे वातावरण आहे. पुर्ण वाढ झालेल्या सुमारे सहा फुट मगरीचे दर्शन होत आहे.

सतर्कता म्हणुन ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना सावध करण्यात आले आहे. वनविभागाने कासारी नदीवर प्रत्यक्ष पहाणी करुन  सुचना केल्या. माजनाळ ते पुशिरे पाणवठा असा साधारण तीन किलोमीटर परीसरात मगर पाहायला मिळते. 

माजनाळ जॅकवेल, पुनाळ व पुशिरे पाणवठ्यावर मगरीचे अस्तीत्व जाणवते आहे .आजतागायत एकच मगर दिसुन येत असली तरी आणखी मगर किंवा तीची पिल्ले असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे .

मगर ही नैसर्गिक अधिवासात राहते. वाघाला पकडणे, मारणे हा जसा गुन्हा आहे तसाच प्रकार मगरीच्या बाबतीत आहे .मगर पकडण्यासाठी नागपुरहुन परवानगी मिळवावी लागते. ती सहजासहजी मिळत नाही.

-  प्रशांत तेंडुलकर, पन्हाळा तालुका परीक्षेत्र अधिकारी

अचानक मगरीचे दर्शन होत असल्याने अफवांना देखील जोर चढत आहे .पण आज पुशिरे पाणवठ्यावर भिकाजी नारायण कांबळे यांना मगरीचे दर्शन घडले. त्यांनी धाडसाने छायाचित्र काढले .सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने मगरीची सत्यता समोर आली आहे 

Web Title: Kolhapur News Crocodile seen in Kasari River

टॅग्स