राधानगरी विधानसभा अरूण डोंगळे यांनी लढवावी - दिनकरराव जाधव :

राधानगरी विधानसभा अरूण डोंगळे यांनी लढवावी - दिनकरराव जाधव :

गारगोटी - राधानगरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. यामुळे 'गोकुळ' चे संचालक अरूण डोंगळे यांनी उमेदवारी लढवावी. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठाम राहतील, असा विश्वास माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी व्यक्त केला.        

कलनाकवाडी (ता. भुदरगड) येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी अरूण डोंगळे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, पक्ष शिस्त पाळण्यासाठी प्रत्येकवेळी माघार घेतली. यावेळी लढण्याचा ठाम निर्णय घेतला असून थांबणार नाही. 

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष किशाबापू किरूळकर, तालुकाध्यक्ष शामराव देसाई, गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे, दिनकरराव कांबळे, बाळासो गुरव, पांडुरंग भांदिगरे यांची भाषणे झाली.
संजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी हिंदुराव चौगले, विजयसिंह मोरे, अभिजीत तायशेटे, प्रकाश देसाई, धीरज डोंगळे, एस. एम. पाटील, सुरेश नाईक, सुधाकर साळोखे, आशीष पाटील आदी उपस्थित होते. डी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  
बी. आर. पाटील यांनी आभार मानले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com