कोल्हापूरातील वडगाव रोडवर फटाका कारखान्यात स्फोट, एक ठार

विवेक दिंडे
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पेठवडगाव - वडगाव भादोले रोडवर  हामिद शिकलगार यांचा फटाक्याचा कारखाना आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास या कारखान्यात स्फोट होऊन एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. प्रकाश शिवराम सावंत असे मृताचे नाव आहे तर शिवाजी दबडे हा गंभीर जखमी झाला आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की फटाका कारखान्यामध्ये दोन कामगार वातीला कागद चिटकविण्याचे काम करत होते. तर कारखान्याच्या मागीलबाजूस साहित्य मिसळण्याचे काम करत होते. वातीला कागद लावण्याचे काम करत असताना या ठिकाणी स्फोट झाला. यामध्ये प्रकाश शिवराम सावंत हे जागीच ठार झाले तर शिवाजी दबडे हा 90 टक्के भाजला गेला आहे. त्याला तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण  अद्याप स्पष्ट झाले नाही. 

स्फोटनंतर आग लागली. या आगीत कारखान्यात साहित्य जळाले. कागदाने पेट घेतल्याने छतही जळाले आहे. घटनास्थळी तातडीने पेठवडगाव येथील अग्निशामक दाखल झाला. त्यांनी लागलेली आग आटोक्यात आणली. 

दरम्यान सहाय्यक पोलिस निरिक्षक इलाई सय्यद, पेठवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यशवंत गवारी, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष अजय थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Kolhapur News Explosion in cracker factory one dead