हसन मुश्रीफ-संजय घाटगे यांच्यात रंगली जुगलबंदी

पंडित कोईगडे
सोमवार, 7 मे 2018

सिद्धनेर्ली - येथे कट्टर विरोधक आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे यांची झालेली भेट व दोघांचा झालेला संयुक्त सत्कार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. श्री. मुश्रीफ यांनी घाटगे यांना ‘जय महाराष्ट्र’ खरोखरच आहे का? अशा विचारलेल्या प्रश्नावर तर्क-वितर्क केले गेले; तर मुश्रीफ यांच्या ‘मी गरीब माणूस आहे’ या वाक्‍यावर घाटगे यांनी ‘तुम्ही तर अतिगरीब’ अशी मिश्‍कीलपणे टिप्पणीही खूप काही सांगून गेली. 

येथे लोकवर्गणीतून ४० लाख रुपये खर्चून विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर उभारण्यात आले. त्याचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा तीन दिवस सुरू आहे. आज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी प्रथम श्री. मुश्रीफ आले. चहापानासाठी एका कार्यकर्त्यांच्या घरी गेले. त्यानंतर श्री. घाटगे यांनी मुलगा अंबरिशसह दर्शन घेतले. इतक्‍यात मुश्रीफ चहापान आटोपून दर्शनासाठी आले. दोघेही समोरासमोर येताना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. दोघेही नेते एकमेकांना भेटतात की टाळतात, हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा रोखल्या.

श्री. घाटगे यांचे कार्यकर्ते विलास पोवार यांनी दोघांना उद्देशूनच विठ्ठलाच्या दारात दोघांची भेट होत आहे, काय योगायोग आहे, अशी संवादाची सुरवात केली. त्यावर मुश्रीफ यांनी ‘मी गरीब माणूस आहे’ अशी प्रतिक्रिया श्री. घाटगे यांच्याकडे पाहत दिली. श्री. घाटगे यांनी वाय. व्ही. पाटील यांना मध्ये घेत ‘हे अतिगरीब आहेत,’ अशी मिश्‍कील प्रतिक्रिया दिली. त्यावर मुश्रीफ यांनी श्री. घाटगे यांना या वेळी ‘जय महाराष्ट्रच आहे का?’ असा खोचक प्रश्‍न विचारला. यावर घाटगे यांनी ‘आहे, आहे’ अशी हसतच प्रतिक्रिया दिली. या वेळी दत्तात्रय पाटील, किसन मेटील, सुभाष मगदूम, रामजी घराळ, एम. बी. पाटील, शहाजी पाटील आदी उपस्थित होते. 

वातावरणातील ताण हलका...
या दोघांतील या जुगलबंदीमुळे वातावरणातील ताण हलका होऊन खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले. श्री. मुश्रीफ यांनी आमचा एकमेकांना विरोध आहे, वैरत्व नाही, अशी केलेली टिप्पणी खूप काही सांगून गेली. मात्र, त्यानंतर उपस्थितांत ‘कागलच्या दोन नेत्यांतील संघर्षाची नेहमी चर्चा सुरू असते. पण, आजच्या खेळीमेळीच्या संवादाने कार्यकर्त्यांतही आनंदाचे वातातरण पसरले,’ अशी चर्चा सुरू होती.

Web Title: Kolhapur News Hasan Mushrif - Sanjay Ghatge Politics