कोल्हापूरला महापुराचा धोका; पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पावसाचा जोर अद्यापी कायम असून राधानगरी धरण 86 टक्के भरले आहे. शहरात पूरस्थिती उद्‌भविण्याच्या आव्हानाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (एनडीआरएफ) संपर्कात आहे

कोल्हापूर - सतत सुरु असल्याने पावसामुळे कोल्हापूर श्‍हहरास महापूराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील 75 बंधारे याआधीच पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीनेही गाठली इशारा पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पातळी सध्या 38 फूट 5 इंच इतकी असून या पातळीत आणखी 7 इंच वाढ झाल्यास शहरास महापुराचा फटका बसण्याची भीती आहे.

पावसाचा जोर अद्यापी कायम असून राधानगरी धरण 86 टक्के भरले आहे. शहरात पूरस्थिती उद्‌भविण्याच्या आव्हानाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (एनडीआरएफ) संपर्कात आहे.

पूरस्थिती मुळे रत्नागिरी कोल्हापूर मार्गाला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news: kolhapur faces flood threat