महादेवराव महाडिकच ‘किंगमेकर’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यात महापालिकेतील सत्तेचे नेतृत्व करणारे दोन्ही काँग्रेसचे नेते व्यस्त असल्याचा फायदा उठवत, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच गेल्या दोन दिवसांत ‘स्थायी’तील घडामोडींत सहभाग घेतल्याचे पुढे आले आहे. 

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यात महापालिकेतील सत्तेचे नेतृत्व करणारे दोन्ही काँग्रेसचे नेते व्यस्त असल्याचा फायदा उठवत, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच गेल्या दोन दिवसांत ‘स्थायी’तील घडामोडींत सहभाग घेतल्याचे पुढे आले आहे. 

‘राष्ट्रवादी’च्या दोन फुटलेल्या नगरसेवकांशी ‘तडजोड’ करण्यापासून ते त्यांना भविष्यातील राजकारणात पाठबळ देण्याचा शब्द देऊन श्री. महाडिक हेच या स्थायी सभापती निवडीमागचे ‘किंगमेकर’ ठरले.

राजाराम कारखाना घडामोडींचे केंद्र
दोन दिवसांपासून श्री. महाडिक यांच्याकडून ही ‘फिल्डिंग’ लावण्यात आली होती. श्री. पवार हे खासदार महाडिक यांच्या घरी जाणार, हे माहीत असूनही महादेवराव महाडिक श्री. पवार यांच्या दौऱ्यात फिरकलचे नाहीत. पण, राजाराम कारखान्यावर बसून त्यांची जोडणी सुरू होती. त्यामुळे निवडीपूर्वी व विजयानंतर राजाराम कारखाना हेच केंद्र ठरले. 

बहुमत असूनही आज झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत दोन्ही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. यामागील घडामोडींचा मागोवा घेतला 
असता श्री. महाडिक यांनीच हे सर्व जुळवून आणल्याचे पुढे आले. या पदासाठी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीकडून आशिष ढवळे व ‘राष्ट्रवादी’कडून मेघा पाटील यांचे अर्ज दाखल झाले. त्याचवेळी ही मोर्चेबांधणी सुरू झाली होती. सुरवातीला या पदासाठी विरोधकांकडून सत्यजित कदम यांचा अर्ज भरला जाणार होता. श्री. कदम यांचा अर्ज आला, तर दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक व नेतेही सावध होतील, म्हणून कदम यांच्याऐवजी श्री. ढवळे यांचा अर्ज भरला. त्यातही आपल्याकडे बहुमत नाही, फक्त बिनविरोध निवड होऊ द्यायची नाही, असा डांगोरा जाणीवपूर्वक विरोधकांकडून पिटला जाऊ लागला.  

शनिवार (ता. १०)पासून ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. एकीकडे श्री. महाडिक यांची ‘जोडणी’ सुरू असताना महापालिकेचे नेतृत्व करणारे आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे श्री. पवार यांच्या दौऱ्यात व्यस्त राहिले. नेमका याचाच फायदा श्री. महाडिक यांनी उठविला. त्यांनी सत्यजित कदम व श्री. ढवळे यांनाच घडामोडींची माहिती दिली. तत्पूर्वी, त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही संपर्क साधला. त्यानंतर आमदार अमल महाडिक व ‘ताराराणी’चे अध्यक्ष स्वरूप महाडिक या आपल्या दोन मुलांनाही विचारले तर त्यांनीही ही गोष्ट अशक्‍य असल्याचे सांगत त्यात फारसे लक्ष घातले नाही. तोपर्यंत श्री. महाडिक यांनी या घडामोडींची सर्व सूत्रे फिरवली होती.

Web Title: Kolhapur News Mahadevrao Mahadik Kingmaker