महिलेच्या खून प्रकरणी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाला अटक

विवेक दिंडे
मंगळवार, 26 जून 2018

पेठवडगांव - भादोले (ता. हातकणंगले) येथे मजुरी करणाऱ्या महिलेचा गळा दाबुन खुन करण्यात आला आहे. रंगुबाई तातोबा कुरणे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पेठवडगांव - भादोले (ता. हातकणंगले) येथे मजुरी करणाऱ्या महिलेचा गळा दाबुन खुन करण्यात आला आहे. रंगुबाई तातोबा कुरणे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

अनैतिक संबंधातुन हा खून झाला आहे. ही घटना रविवारी (ता.२४) दुपारी घडली होती. याप्रकरणी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भिवाजी रामा पाटील (वय४८) याला अटक केली अाहे. 

याबाबत अधिक माहिती अशी - रंगुबाई कुरणे यांचे माहेर भादोले असुन त्यांचे सावर्डे सासर आहे. बारा वर्षापुर्वी पतीचे निधन झाल्यामुळे त्या एक मुलगा महेश याच्यासह भादोले येथे आईकडे रहाण्यास आल्या होत्या. एक वर्षापुर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्या घरी मुलासोबत रहात होत्या. त्या गेली अनेक वर्षे भिवा पाटील यांच्याकडे शेत, घर, गोठ्यातील मजुरीची कामे करीत होत्या.

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भिवाजी पाटील यांनी रंगुबाई यांच्या चुलत भावास फोन केला व रंगुबाई तंबाखु खाल्यामुळे ऊसाच्या शेतात बेशुध्द अवस्थेत पडल्या असल्याचे सांगितले. यानंतर सर्व नातेवाईक झुंनझुनाचा माळा येथे भिवाजी पाटील यांच्या घराकडे आले. त्यांनी उपचारासाठी सुरवातील गावातील डॉ. महेश पाटील नंतर पेठवडगांव येथील एका खासगी रुग्णालयात हलवले परंतु याठिकाणी त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना भादोले प्राथमीक आरोग्य केंद्रात नेले. याठिकाणी रंगुबाई यांच्या गळ्यावर खुना असल्याचे निदर्शनास आले. यावेळी भिवाजी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे नातेवाईकांनी तिचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात हलवला. यावेळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता तिचा गळा दाबुन खुन केल्याचे उघडकीस आले. यावरुन नातेवाईकांनी पेठवडगांव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

 

Web Title: Kolhapur News Murder in Bhadole