राधानगरीत 19 पासून पर्यटन महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

राधानगरी - जिल्ह्यासह राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळक असलेल्या राधानगरी व दाजीपूर परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी येथील वैशिष्ट्यांना घेऊन शनिवार (ता.19) व रविवार (ता. 20) येथे राधानगरी पर्यटन महोत्सव होत आहे. दोन दिवसाच्या महोत्वसात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती व काजवा महोत्सवही यात असेल. 

शनिवारी (ता.19 ) सकाळी पर्यटकांचे स्वागत व महोत्सवाचे उद्‌घाटन श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व अभिनेते हार्दीक जोशी (राणा) व अक्षया देवधर (अंजली) यांच्या हस्ते होईल. 

शोभायात्रा, गजनृत्य, लेझीम,  झांजपथक, ढोल, हालगी यांचा बाज असेल. यानंतर राधानगरी छायाचित्र प्रदर्शन व चित्रफितीचे उद्‌घाटन त्यानंतर पर्यटन निवास इमारतीची लोकार्पण सोहळा पाहुण्यांच्या हस्ते होईल. खाद्य जत्रेमध्ये ग्रामीण पध्दतीचे शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचा स्वाद घेता येईल. दुपारी कृषीतज्ञ संजीव माने यांचे कृषी मार्गदर्शन होईल. सायंकाळी सहा वाजता काजवा महोत्सवाचे उद्‌घाटन अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते काळम्मावाडी रोडवरील कार्यक्रमस्थळी होईल. याच ठिकाणी "निसर्गगाणी" हा कार्यक्रम असेल. 

हे असेल महोत्सवात.. 

  • खाद्य जत्रा (ग्रामिण शाकाहारी व मांसाहारी जेवण). 
  • कृषी विषयी मार्गदर्शन. 
  • धरण,जंगल सफारी 
  • "निसर्गगाणी" सांस्कृतिक कार्यक्रम. 
  • छायाचित्र,चित्रफिती प्रदर्शन 
  •  पारंपारिक वाद्यांचा बाज 

20 मे रोजी सकाळी नऊला महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे. पर्यटकांसाठी स्थळदर्शनात राधानगरी व काळम्मावाडी धरण,जंगल सफारी होईल. सायंकाळी अभिनेत्री माधवी निमकर व शुभांजी गायकवाड यांचा "स्वरचांदणे" कार्यक्रम होईल. 

मोफत काजवा महोत्सव 
येथील बायसन नेचर क्‍लबच्या वतीने यंदा येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी 19 मे ते 31 मे पर्यंत मोफत काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. काळम्मावाडी रोडवर हा कार्यक्रम होईल, असे अध्यक्ष सम्राट केरकर यांनी सांगीतले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Radhanagari Tourism Festival