शिवसेनेकडून कोल्हापूर पालिकेस बांगड्यांचा आहेर

संभाजी थोरात
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कोल्हापूर -  शहर आणि परिसरातील अनधिकृत बांधकामे न पाडता त्या बांधकामांना मनपा प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत आज शिवसेनेने आंदोलन केले. संतप्त शिवसैनिकांनी कोल्हापूर महापालिकेस बांगड्या आहेर दिला.  यामध्ये महिला शिवसैनिकही सहभागी झाल्या होत्या.

मनपा प्रशासन अनधिकृत बांधकामांना बळ देत आहे. यामध्ये भ्रष्टाचारही होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी बांगड्यांचा आहेर भरत  आंदोलन केले.  शिवसैनिकांनी गाड्या मधूनच अनेक काचेच्या बांगड्या आंदोलनस्थळी आणल्या होत्या. यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करत संतप्त शिवसैनिकांनी या बांगड्या महापालिकेच्या गेटला लावल्या. आंदोलनाच्या निमित्ताने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही शिवसैनिकांनी हे आंदोलन यशस्वी केले. 

Web Title: Kolhapur News Shivsena agitation