यंत्रणा राबतेय एसटीची, लाभ मात्र खासगीला

शिवाजी यादव
बुधवार, 30 मे 2018

कोल्हापूर - शिवशाहीची आलिशान बससेवा एसटी महामंडळ चालवत असले, तरी १५०० बस खासगी कंपनीच्या व पाचशे बस महामंडळाच्या आहेत. यात खासगी कंपनीला करारानुसार रोज साडेतीनशे किलोमीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतात. 

कोल्हापूर - शिवशाहीची आलिशान बससेवा एसटी महामंडळ चालवत असले, तरी १५०० बस खासगी कंपनीच्या व पाचशे बस महामंडळाच्या आहेत. यात खासगी कंपनीला करारानुसार रोज साडेतीनशे किलोमीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतात. 

एसटीने राबायचे आणि आर्थिक लाभ खासगी कंपनीने उचलायचा याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. तीन वर्षांत राज्यातील ३७० हून अधिक मार्गावर धावणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या एसटी बस रद्द केल्या. परिणामी रात्री दहानंतर मुंबई, पुणे, लातूर, नाशिक आदी शहरांकडे जाण्यासाठी गाड्याच नाहीत. त्यामुळे एसटीचा प्रवासी वर्ग खासगी वाहतुकीकडे वळला. अशी स्थिती राज्यभर आहे. 

एसटीला वर्षाला एक हजार कोटींचा तोटा होतो, पोलिस वर्दीनुसार कैदी वाहतुकीचे पैसे, शासकीय देणी एसटीला मिळलेली नाहीत, विविध सवलतींचा बोजा आहे. या सर्वांत एसटीचा संचित तोटा दोन हजार कोटींचा आहे.  

एसटीला आरामदायी गाड्या घेण्यासाठी स्वतःचे पैसे नाहीत. शासन निधी देत नाही. प्रवाशांची गरज भागविण्यासाठी खासगी वाहतुकीला स्पर्धा करणे एसटी प्रशासनाला जिकिरीचे बनले आहे. त्यातूनच खासगी वाहतूकदारांची मदत घेऊन कोल्हापुरात भगिरथी व प्रसन्ना अशा दोन कंपन्यांच्या शिवशाही बस घेतल्या. राज्यात अन्यत्र इतर संस्थांकडून शिवशाही गाड्या घेतल्या. त्यांना रोज साडेतीनशे किलोमीटरचे पैसे द्यावे लागतात. अनेक मार्गावर प्रवासी जेमतेम असतात, करारातील अटीनुसार साडेतीनशे किलोमीटरप्रमाणे पैसे द्यावे लागतात. यामुळे कोल्हापुरातून जवळपास ५ ते ७ लाखांचा महसूल शिवशाहीला जातो. या गाडीवर वाहक एसटीचा, बसस्थानक एसटीचे, येणारे प्रवासी एसटीचे असतात. त्याच बहुतांशी लाभ शिवशाहीला जातो. 

शिवशाहीची सेवा चांगलीच आहे, त्याचे स्वागत करतो. मुंबईत बसून काही अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मर्यादित अधिकारामुळे ज्या मार्गावर प्रवासी संख्या जास्त, त्या मार्गावर गाड्या मिळत नाहीत, अशी स्थिती आहे.
- एक सेवानिवृत्त वाहतूक अधिकारी

Web Title: Kolhapur News Shivshahi v/s Lalpari